व्याख्यानमाला व्याखानमाला म्हणजे आपल्या आयुष्यात अपार संघर्ष करून आणि देईदीप्यमान यश मिळवलेल्या विख्यात व्यक्तिमत्तवांचे विचार ऐकण्याची एक सुंदर पर्वणी..
या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी ज्ञान खूप आवश्यक असते. हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्याकडे खूप सारे पर्याय उपलब्ध असतात आणि त्या पर्यायांपैकी एक म्हणजे व्याख्यानमाला. विद्यार्थीदशेत असताना आपल्या ज्ञानाची रिकामी झोळी भरून घेण्यासाठी, उच्च विचारांमधून प्रेरणा मिळवून आपल्या अस्तित्वाची जाणीव या समाजाला करून देण्यासाठी ज्या स्फूर्तीची आवश्यकता असायला हवी त्या उद्देशाला डोळयांसमोर ठेवून व्याख्यानमाला आयोजित करण्याची सुरुवात गेल्यावर्षीपासून आपल्या महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात (SPACE) झाली.
गतवर्षी महेश काळे यांच्या व्याख्यानाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाला पाहून व्याख्यानमालेला वेगळया उंचीवर घेऊन जाण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा उत्साह शिगेला पोचवण्यासाठी या वर्षी तीन मोठ्या व्यक्तिमत्तवांना आमंत्रित करण्यात आले होते. पहिले होते कायद्याचे डॉन, कसाबचा कर्दनकाळ, एक उच्च दर्जाचे विशेष भारतीय सरकारी वकील, पद्मश्री डॉ. उज्ज्वल निकम, दुसरे होते हिम्मतबाज, धडाके बाज व्यक्तिमत्व असणारे IAS ऑफिसर तुकाराम मुंढे, शेवटचे होते सियाचीन सारख्या प्रदेशात देशराखण करणारे रिटायर्ड आर्मी ऑफिसर कर्नल शैलेश रायकर.
"आयुष्य हे कुठेही आनंदाने बागडण्याच क्रीडांगण नाही तर प्रतिकूल परिस्तिथित लढण्याचं समरांगण आहे. कुठे थांबाव आणि कुठे बोलाव ही तत्त्व आयुष्यात आत्मसात करता आली पाहिजेत. निवडणूक ही लोकशाहीची आत्मा असली तरीही कॉलेज मध्ये ह्या निवडणूकांचं मारामारी, भांडण यामध्ये होणार परिवर्तन अभ्यासाला विचलित करणारं असतं. ज्या ज्या वेळेस तुमच्या आयुष्यात संकट येतील त्या त्या वेळेस तुमचा मालक म्हणजे परमेश्वर तुम्हाला त्या संकटांना तोंड द्यायला लावत असतो आणण तुम्ही त्या संकटांवर मात करून पुन्हा भक्कम व्हा याची अपेक्षा करत असतो." - पद्मश्री उज्ज्वल निकम.
" आयुष्यात नेहमी नैतिकता, निष्ठा आणि सत्य या तीन गोष्टी माणसाला यशस्वी बनवतात. नाहीतर शेवट हा अतिशय वाईट होणार हे नक्की. प्रत्येक विषयाच्या दोन बाजू असतात पॉझीटीव्ह आणि नेगेटिव्ह मग हे तुमच्यावर अवलंबून असतं की आनंदी राहायचा की नाही. आयुष्यात जे काही कराल ते systamatic and planned असावे. आयुष्यात समाधानी राहायला शिका. पैसे हे सर्वस्व नव्हे, त्यातून समाधान मिळायला हवा. मला कोणीतरी चांगला म्हणावे ही समाधानाची खरी व्याख्या. फक्त ध्येय असून चालत नाही तर ते सतत डोळयात जपणं महत्वाचं असत." - तुकाराम मुंढे.
"देशाचं अस्तित्व आर्मीच्या ताकदेवरचं अवलंबून असतं. सियाचीन सारख्या ठिकाणी राहणं म्हणजे लेचापेचा असून चालत नाही तर त्यासाठी धिप्पाड शरीरयष्टि लागते. देशसेवा करण्यातला आनंदच वेगळा असतो. जेव्हा जेव्हा देशात आपत्कालीन स्थिती निर्माण होईल तेव्हा तेव्हा आर्मीचीच गरज पडणार."- कर्नल शैलेश रायकर.
या व्याख्यानमालेचे उद्दिष्ट फक्त ज्ञान मिळवणं एवढं नव्हतं तर त्या व्याख्यानांमधून प्रेरणादायी हेतू प्राप्त करणं होतं आणि तो हेतू साध्य करून ह्या व्याख्यानमालेची सांगता झाली.